चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, फक्त 99 रुपयांत पाहा कोणताही चित्रपट
जर तुम्हाला पीव्हीआरसारख्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर तुम्हाला लवकरच ही संधी मिळणार आहे.
Cinema Lovers Day Movies Ticket : मोठ्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणं हे प्रत्येकालाच आवडते. मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम यांसारखे विविध भाषेचे चित्रपट प्रेक्षक हल्ली चित्रपटगृहात जाऊन पाहतात. मोठमोठ्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणं हे फारच खर्चीक असतं. त्यामुळे अनेकजण इच्छेला मुरड घालून एका साध्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे पसंत करतात. पण जर तुम्हाला पीव्हीआरसारख्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर तुमच्यासाठी लवकरच ही संधी मिळणार आहे.
फक्त 23 फेब्रुवारीपर्यंत असणार ऑफर
येत्या शुक्रवारी म्हणजेच 23 फेब्रुवारीला 'सिनेमा लव्हर्स-डे' (Cinema Lovers Day 2024) साजरा केला जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारी तुम्हाला कोणताही चित्रपट फक्त 99 रुपयात पाहता येणार आहे. विशेष म्हणजे ही ऑफर पीव्हीआर आणि आयनॉक्स यांसारख्या मोठ्या चित्रपटगृहातही असणार आहे. ही ऑफर फक्त 23 फेब्रुवारीसाठी मर्यादित असणार आहे.
असं करा बुकींग
पीव्हीआर आणि आयनॉक्स यांसारख्या मल्टिफ्लेक्समधील तिकिटांची किंमत ही 200 रुपयांपासून ते अगदी 1000 रुपयांपर्यंत असते. पण येत्या शुक्रवारी तुम्हाला कोणताही चित्रपट फक्त 99 रुपयात पाहता येणार आहे. यासाठी तुम्हाला कोणताही कोड वापरण्याचीही गरज भासणार नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे तुम्हाला जो चित्रपट पाहायला आहे, त्याचे ऑनलाईन तिकीट बुकींग करायचे. विशेष म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सर्व शोसाठी ही ऑफर असणार आहे.
पण ही ऑफर प्रीमियम फॉरमॅट आणि रिक्लिनर्स यासाठी लागू होणार नाही. तसेच तिकीटाचे बुकींग केल्यानंतर तिथे करही लागू होणार आहे. रिक्लिनर्स सीटसाठी तुम्हाला 199 रुपये मोजावे लागतील. प्रेक्षकांना स्वस्तात चित्रपट पाहता यावा आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
'हे' चित्रपट होणार प्रदर्शित
दरम्यान येत्या आठवड्यात अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 'आर्टिकल ३७०' ,'क्रॅक', 'ऑल इंडिया रँक', 'आता वेळ झाली' हे चार नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याबरोबरच 'श्रीदेवी प्रसन्न' , 'छावा' हे दोन मराठी चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहेत. त्यासोतबच गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''तेरी बातो में ऐसे उलझा जिया' या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला येत्या शुक्रवारी फक्त 99 रुपयात अनेक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.