मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ टायगर 3 च्या शूटिंगसाठी परदेशात जाताना विमानतळावर दिसले. अभिनेता सलमान खानला सीआयएसएफ ( CISF ) अधिकाऱ्याने विमानतळावर थांबवले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा सलमान खान गेटवर पोहोचतो


 सलमान खान कतरिना कैफसोबत त्याच्या आगामी टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाला गेला होता. एका फोटोग्राफरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ  शेअर केला आहे. ज्यात अभिनेता सलमान खानला विमानतळावर फोटोग्राफर आणि चाहत्यांनी घेरले होते. पण सलमान खान अखेर गेटवर पोहोचतो . पण त्याला मुंबईतील सीआयएसएफ अधिकाऱ्याने विमानतळावरील गेटवरच थांबवले.


सीआरपीएफने सलमान खानला का रोखले? 


जेव्हा सलमान खान गर्दीला चकवून विमानतळाच्या प्रवेशद्वारावर पोहोचला, तेव्हा दरवाजावर तैनात असलेल्या सीआयएसएफ अधिकाऱ्याने त्याला थांबवले आणि विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी त्याची सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यास सांगितले.



विमानतळावर सलमानच्या मागे असलेली गर्दी देखील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नियंत्रित केली. या व्हिडिओने इंटरनेट यूजर्सचे लक्ष वेधले आहे, अनेकांनी अधिकाऱ्याचे योग्य रित्या ड्युटी करताना पाहून त्यांचे कौतुक देखील केले आहे.