मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं सावट पसरत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. आता कोरोना व्हायरसमुळे जापानी विनोदवीर केन शिमुरा यांचं  निधन झालं आहे. त्यामुळे कलाविश्वातून आणि त्याच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शिमुरा यांना कोरोणाची लागण झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोणाची लागण झाल्याचं कळताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण ७० वर्षीय शेमुरा यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या आधी हॉलीवुडचे सुपरस्टार मार्क ब्लम (Mark Blum) और सिंगर सीवाय टकर (Cy Tucker)यांचा कोरोनामुळे निधन झाले आहे.



देशात त्याचप्रमाणे राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून नागरिकांनी घरीच राहण्याला पसंती दिली पाहिजे, असं आवाहन वारांवार करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाचे २०७ रुग्ण असून त्यातील ८ जणांचा मृत्यू झालाय. यात मुंबईतील ८५ रुग्ण आणि ६ मृतांचा समावेश आहे. 


तर संपूर्ण जगात आतापर्यंत ३४ हजार रुग्ण या धोकादायक विषाणूमुळे मरण पावली आहेत. तर ७ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.