Bharati Singh : भारती सिंग ही कॉमेडीयन म्हणून सगळीकडे चांगलीच लोकप्रिय आहे. तिने 'कॉमेडी नाईट्स' आणि 'कॉमेडी सर्कस' अशा कार्यक्रमांमधून सहभाग घेत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेली अनेक वर्षे ती अशाच कॉमेडी शोमधून नावारूपाला आली तसेच अनेक डान्स रिएलिटी शोंचे तिने सुत्रसंचालनही केले आहे. काही वर्षांपुर्वीच तिचे लग्न झाले असून नुकताच तिने एका मुलाला जन्म दिला आहे. तिच्या बाळाचे तिने बेबी फोटोशूट केले आहे. हे सर्व फोटोज तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सुरूवातीला तिच्या फोटोंवरती असंख्य लोकांनी कमेंट्स करून तिच्या बाळाच्या या फोटोशूटचे कौतुकही केले होते. परंतु नुकताच तिने आपल्या बाळाचा फोटो अपलोड केला आहे. ज्यावर मात्र तिच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीने नुकतेच आपल्या बाळाचे नवीन फोटोशुट केले आहे. ज्यात त्याच्या डोक्यावर शेखांप्रमाणे टोपी घातली आहे आणि त्याच्यासमोर चक्क हूक्का ठेवला आहे. हा फोटो भारतीने तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केला आहे. त्यावर नेगेटिव्ह कमेेंट्सचा पाऊस पडला आहे. काही ट्रोलर्सनी असं लिहिलं आहे की, ''क्या भारती अभीसेही बच्चे को हुक्का लेना सिखाओंगी क्या?'' तर दुसऱ्या एका ट्रोलरने कमेंट केली आहे की, 'क्या भारती अभी से सी चाहती हो की नर्कोटिक्स पकड के ले जाए..?''


अनेकांनी तिने तिच्या बाळाच्या केलेल्या या फोटोशूटवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या चाहत्यांनी तिला असे फोटोशूट करून आपला मान न घालवण्याचाही सल्ला दिला आहे. तर काहींनी तिला या कृत्याबद्दल माफीही मागायला सांगितली आहे. भारती सिंग याआधी तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे ट्रोल झाली होती. आता परत आपल्या बाळाच्या या अरब फोटोशूटमुळे तिला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागतो आहे. 



भारती सिंग सध्या आपल्या बाळाचेच फोटोज व्हायरल करते. मध्यंतरी तिने आपल्या बाळाला तीन महिने पुर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचा वाढदिवस साजरा केला होता.