Kapil Sharma Instagram Post: पुरूषांनी कोणते कपडे घालावे कोणते नाही यावर अनेकदा वाद विवाद होत असतात. उदाहरणार्थ, पुरूषांनी गुलाबी रंगाचे कपडे घालू नयेत असा एक मतप्रवाह होता. गुलाबी रंग हा मुलींचा रंग आहे, मुलांनी अशा रंगाचे कपडे घालणं हे लांज्यास्पद आहे. तेव्हा जर का कोणा पुरूषाने गुलाबी रंगाचे, फ्लोरल प्रिंटचे कपडे घालेच तर त्याची खिल्लीही उडवायला लोकं मागेपुढे बघत नाहीत. (comedian kapil sharma says that wearing pink is the coolest thing a real man could wear post goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला माहितीये का? प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मानं (Kapil Sharma) मात्र हा विचार मोडून काढला आहे आणि त्यानं यावर नुसतीच वाच्यता केली नाही तर आपल्या कृतीतूनही उत्तर दिलं आहे. 


कपिल शर्मानं नुकताच इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो गुलाबी शर्टमध्ये दिसतोय. हा फोटो शेअर करताना त्यानं असं म्हणलं आहे की गुलाबी कपडे घालणं हा पुरूषांसाठी कमीपणा नाही तर ती अभिमानाची गोष्ट आहे. गुलाबी रंगाचे कपडे घालणं हाच खरा पुरूषार्थ आहे. 


पिंकमधील कपिल शर्माने त्याचा नवा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने पिंक कलरचा आउटफिट परिधान केला आहे. देखावा पूर्णपणे जबरदस्त आहे. हे पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मुले गुलाबी कपडे घालू शकतात का? होय, तुम्ही बरोबर वाचलं आहं. पुरुष गुलाबी कपडे घालतात. गुलाबी हा नेहमीच मुलींचा रंग नसतो. 18 व्या शतकातील पुरुष गुलाबी रेशमी सूट परिधान करण्यासाठी ओळखले जात होते ज्यात फुलांचीही नक्षी होती. 


कपिलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रेटींनी कमेंट्सचा पाऊस केला आहे. यात हरभजन सिंगचाही समावेश आहे. 



कपिल शर्माने 'द कपिल शर्मा शो'च्या (The Kapil Sharma Show) नवीन सीझनचा पहिला प्रोमो एक दिवसापूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा शो तुम्हाला 10 सप्टेंबरपासून शनिवार आणि रविवारी सोनी वाहिनीवर पाहता येणार आहे.


कपिल शर्माही लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. Zwigato असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील कपिलचा फर्स्ट लूक समोर आला आहे.