मुंबई : 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. मुख्य म्हणजे कपिल आणि त्याची संपूर्ण टीम मिळून या सेलिब्रिटींना काही तास एका वेगळ्या आणि धमाल वातावरणाची अनुभूती देते. पण, अभिनेते गोविंदा यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली तेव्हा मात्र काहीसं वेगळं चित्रं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंदा या कार्यक्रमात आले खरे. पण, त्यांच्या येण्याच्या निमित्तानं कपिलच्या कार्यक्रमात दिसणाऱ्या एका प्रसिद्ध कलाकारानं मात्र अनुपस्थित राहणं पसंत केलं. हा कलाकार म्हणजे कृष्णा अभिषेक. त्याच्या अनुपस्थितीस कारण ठरलं ते म्हणजे या मामा- भाच्यामध्ये असणारा वाद. 


 


मागील वर्षीही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं. पण, आतातरी हा वाद मिटला असेल असा सर्वांनाच अंदाज होता. पण, मुळात तसं झालेलं नाही हेच कृष्णाची अनुपस्थिती सांगून गेली. मुळात या दोघांमध्येही कोणत्या कारणानं हे मतभेद आहेत ते मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही. तेव्हा आता या दोन्ही सेलिब्रिटींच्या नात्यात असणारा वाद मिटून ते केव्हा एकत्र येणार याचीच चाहत्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.