Sunil Grover: कधी कुणावर कसली वेळ येईल हे काहीच सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला आयुष्यात कधी काय घडेल हेही सांगता येत नाही. सध्या अशाच एका कलाकारावरही (Comedian) अशीच एक वेळ आली ज्यात तो चक्क भाजी आणि दूध विकता दिसला होता आता चक्क बाथटममध्ये पाण्याशी खेळता दिसत आहे. या कलाकारवर नक्की (Instagram Post) अशी वेळ का आली आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कारण याची माहिती त्यानं खुद्द आपल्या इन्टाग्राम पोस्टवरून दिली आहे. अशा अवस्थेत पाहून त्याच्या चाहत्यांना चक्क मोठा धक्काच बसला आहे. हा कलाकार काही साधा सुधा कलाकार नाही तर यानं आपले नावं हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून (Hindi Industry) मोठ्या जिद्दीनं कमावले आहे त्यातून त्याला कॉमेडी किंगचा दर्जाही देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो चक्क कॉमेडी किंग सुनील ग्रोवर (Sunil Grover Instagram Post) आहे. सुनील ग्रोवरनं कपिल शर्माच्या शोमधून अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. कपिल शर्मासोबत एकेकाळी विनोदी शोंची सुरूवात करणारा हा कलाकार अचानक अशा अवस्थेत का दिसतो आहे हे पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सुनीलनं आपल्या इन्टाग्रामवरून (Sunil Grover Instagram Post) दोन फोटोज पोस्ट केले होते ज्यात तो एका फोटोत बटाटे आणि कांदे विकताना दिसतो आहे. तर दुसऱ्या फोटोत तो चक्क दूध (Milk) विकताना दिसतो आहे. त्यातून सध्या नुकत्याच एका फोटोमध्ये त्यानं आपला बाथटममधला फोटो शेअर केला आहे. ज्यात तो टॉवेल गुंडाळून बसलेला दिसतो आहे. त्यामुळे नक्की त्याचं चाललंय काय हे कळायलाही मार्ग नाही. 



सध्या त्याचे असे एकेक फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.



त्याचसोबत त्यानं यापुर्वी असाच एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यात तो थंडीत चार लोकांसोबत शेकोटीसमोर बसला होता. त्यामुळे नक्की त्याचं चाललंय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतो आहे.