मुंबई : डॉक्टर मशहूर गुलाटी आणि गुत्थी यांसारख्या भूमिका साकारणारा अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हरबद्दल एक मोठी बाब समोर आली आहे. सुनील ग्रोवर याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. या शस्त्रक्रियेची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येतेय.


मुंबईतील रूग्णालयात दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवरून याबाबत माहिती मिळाली आहे. या पोस्टमध्ये सुनील ग्रोवरचा फोटो पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये लिहिलंय की, अभिनेता सुनील ग्रोवर रूग्णालयात दाखल असून त्याच्यावर हृदयासंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्या तब्येतीत सुधारणा होतेय. 


सुनील ग्रोवर ही बातमी समोर आल्यापासून चाहत्यांनी त्याच्या आरोग्याबाबत काळजी वाटत आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी लोक प्रार्थना करतायत. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लाइटमध्ये कपिल शर्माचे कॉमेडियन सुनील ग्रोव्हरसोबत भांडण झालं होकं. या प्रकरणाने एकेकाळी तो खूप गाजलं होतं. त्यामुळे या घटनेनंतर सुनील आणि कपिल एकाही शोमध्ये एकत्र दिसले नाहीत.