Sunil Pal on Kapil Sharma Show : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो म्हणजे कपिल शर्मा याचा. परंतु नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या शोमधून लोकप्रिय कलाकार बाहेर पडत आहेत. तसेच लवकरच द कपिल शर्मा शोचा नवा सीझन येत आहे. 10 सप्टेंबर रोजी या शोच्या चौथ्या सीझनचा पहिला एपिसोड टीव्हीवर येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आपल्या 'कटपुतली' या चित्रपटाचं प्रमोशन करायला येणार आहे. नव्या सिझनची उत्सुकता असली तरी मात्र या शोमधून बाहेर पडलेले कलाकार असं का बरं सोडून गेले यावर कॉमेडीयन सुनील पाल यांनी सवाल उपस्थित केला आहे. त्यातील एक कलाकार आहे तो म्हणजे कृष्णा अभिषेक. कृष्णाने हा शो सोडला आहे. सपना, जग्गू आणि नकली धरम ही पात्रं तो या शोमध्ये साकारत होता. पैशांमुळे कृष्णानं शो सोडला असल्याचे बोललं जात आहे. 


परंतु अशाप्रकारे शो सोडून जाऊन या कलाकरांना काय मिळणार आहे? असा सवाल सुनील पाल यांनी विचारला आहे. त्यांचा नुकताच एक व्हिडीओ इन्टाग्रामवर त्यांनी शेअर केला ज्यात त्यांनी म्हटले आहे की, ''हा शो सोडून हे कलाकार फार मोठी चूक करत आहेत. या शोनं त्यांना ओळखून मिळवून दिली. कपिल शर्मानं त्यांना ओळख, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली परंतु आता तेच कलाकार हा शो सोडून जातायत? याला काय म्हणावं.. हे लोकं बाहेर जाऊन काय करणार... तीच तीच सी ग्रेड फिल्म्स?'', असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


"द कपिल शर्मा शो मधून ऐकले आहे की कृष्णा भाई बाहेर पडणार आहे. प्रत्येकजण असे का करतो? कपिल शर्मा शो चांगला चालला आहे. तुम्हाला चांगली नोकरी मिळत आहे. तुम्हाला बाहेरून 100 पट जास्त पैसे मिळत आहेत. तुम्ही बाहेर गेल्यावर काय कराल? त्याच छोट्या मालिका? बी-सी ग्रेड चित्रपट?  कपिल शर्माने स्टेज दिला, नाव दिले, पैसे दिले आणि तेच लोकं त्याला सोडतात.'', असा सवाल त्यांनी उठवला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कपिल शर्मा शोमधून वेगळे झाल्याबद्दल बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला होता की काही काळासाठी मी कपिल शर्मा टीममधून थोडा ब्रेक घेतला आहे. कपिल शर्मासोबत माझी कोणताही वैयक्तिक राग नाही. तो खूप चांगला माणूस आहे." कृष्णापूर्वी अली असगर आणि उपासना सिंग यांनीही कपिल शर्माच्या शो सोडला होता. 


'द कपिल शर्मा शो'च्या तिसऱ्या सीझनचा शेवटचा भाग 5 जून रोजी टीव्हीवर प्रसारित झाला. त्यानंतर कपिल त्याच्या टीमसोबत कॅनडा आणि अमेरिका दौऱ्यावर रवाना झाला. परत आल्यानंतर कपिलने आपला नवीन लूक शेअर केला आणि शोच्या नवीन सीझनची घोषणा केली. शोच्या नव्या सीझनमध्ये कपिल शर्माच्या टीममध्ये काही नवीन लोक दिसणार आहेत. टीव्ही अभिनेत्री सृष्टी रोडे, इश्तियाक खान, सिद्धार्थ सागर, गौरव दुबे यांसारखे विनोदी कलाकार या शोचा भाग असणार आहेत.