प्रसिद्ध दाक्षिणात्य विनोदवीर एका चित्रपटासाठी आकारतो `इतकं` मानधन, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
ब्रह्मानंदम यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले. ते जवळपास 450 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अनेक दाक्षिणात्य कलाकार हे सातत्याने चर्चेत असतात. यातील एक अभिनेते म्हणजे ब्रह्मानंदम. विनोदाच्या अचूक वेळेसाठी ब्रह्मानंदम यांना ओळखले जाते. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्या विनोदाने वेगळी छाप पाडली आहे. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. ब्रह्मानंदम यांना पाहिल्यानंतर सर्वच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुटते. ब्रह्मानंदम यांनी आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त चित्रपटात काम केले. त्यामुळे त्यांच्या नावाचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये होतो.
31 वर्षात 1 हजारहून अधिक चित्रपट
ब्रह्मानंदम यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1956 रोजी आंध्रप्रदेशच्या एका गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव कन्नेगन्ती ब्रह्मानंदम असे आहे. पण त्यांना ब्रह्मानंदम याच नावाने ओळखले जाते. ब्रह्मानंदम यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अनेक नाटकात काम केले आहे. मोद्दाबाई या नाटकात काम करतेवेळी तेलुगू दिग्दर्शक जन्ध्याला यांनी त्यांना पाहिलं. यानंतर त्यांनी ब्रह्मानंदम यांना एका चित्रपटासाठी विचारले आणि ती भूमिका प्रचंड गाजली. यानंतर मात्र ब्रह्मानंदम यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत एक हजारहून अधिक चित्रपट केल्याचा वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर चित्रपटांच्या बाबतीतही ते तितकेच श्रीमंत आहेत.
प्रत्येक चित्रपटासाठी घेतात इतकं मानधन
ब्रह्मानंदम यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले. ते जवळपास 450 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज, इनोव्हा, ऑडी क्यू 7 आणि ऑडी आर 8 यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. याशिवाय कोट्यावधी रुपयांची शेतजमीनही त्यांच्या नावावर आहे. ब्रह्मानंदम यांचा हैदराबादमधील उच्चभ्रू वसाहत असलेल्या जुबली हिल्स येथे एक आलिशान बंगलासुद्धा आहे. ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी मानधन आकारतात.
ब्रह्मानंदम यांनी आतापर्यंत 1100 चित्रपटांपेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. 2007 साली 700 हून जास्त चित्रपटात काम करणारे अभिनेते म्हणून त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यासोबतच 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लवकरच झळकणार चित्रपटात
दरम्यान ब्रह्मानंदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'Keeda Cola' असे त्यांच्या नवीन चित्रपटाचे नाव आहे. हा एक कॉमेडी-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण भास्कर करत आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.