नवी दिल्ली : कपिल शर्मा (Kapil Sharma)ला कॉमेडी किंग अशी ओळख मिळाली असली तरीही तो खूप चांगला अभिनेता, एंकर, होस्ट आणि सिंगर देखील आहे. फॉर्ब्स इंडिया (Forbs India)सेलिब्रिटीच्या टॉप 100 च्या लिस्टमध्ये देखील दिसला होता.  आधी कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट विथ कपिल' शो यायचा. आता तो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)च्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉमेडी शो व्यतिरिक्त कपिलने सिनेमामध्ये देखील काम केलंय. कपिल शर्माकडे कॉमेडी शोजच्या व्यतिरिक्त कमाईची अनेक साधन आहेत. या कमाईचा हिस्सा म्हणून तो सरकारला किती टॅक्स देतो हे तुम्हाला माहितेय का ?



कॉमेडी किंग कपिलने आपल्या शोच्य दरम्यान इनकम टॅक्स बद्दल खुलासा केलाय. तो एका वर्षात १५ कोटी रुपये इनकम टॅक्स भरतो. इनकम टॅक्स भरत राहणं गरजेचं आहे कारण यामुळे आपल्या देशाच्या विकासात आपण योगदान देतो असे कपिलने म्हटलंय. 


ज्या कार्यक्रमात कपिलने हा खुलासा केला होता त्यात ऐश्वर्या राय बच्चन पाहुणी म्हणून आली होती. कपिलच्या इनकम टॅक्स आकड्याबद्दल ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.