मुंबई: जिकडे-तिकडे 'गली बॉय' सिनेमाच्या चर्चा रंगत असताना या चर्चांना आणखी उधान आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान भक्कम केले आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांना चाहत्यांनी चांगलीच दाद दिली आहे. सिमेनाच्या गाण्यांना चाहत्यांनी इंटरनेटवर डोक्यावर घेतले आहेत. सिनेमाचे निर्माते सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणत्याही प्रकारची कसर सोडताना दिसत नाहीत. त्यात चाहतेही टिक टॉकवर व्हिडिओ करुन सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. हुबेहुब आलिया सारख्या दिसणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनाया नावाच्या मुलीने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन सिनेमाच्या संभाषणाचे एक टिक-टॉक व्हिडिओ पोस्ट केले. सिनेमाच्या एका डायलॉगमध्ये ''मेरे ब्वॉयफ्रेंड से गुलू-गुलू करेंगी तो धोपतुईंगी न उसको'' असे आलिया म्हणते. या संभाषणावर तिने व्हिडिओ केला आहे. पाहा व्हिडिओ



 


सिनेमाचे दिग्दर्शक जोया अख्तर, निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केले आहे. आलिया भट्ट-रणवीर सिंहची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कलकी कोचलिन सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.हा सिनेमा बऱ्याच कारणांमुळे विशेष आहे 'गली बॉय'मध्ये चाहत्यांना अनेक गोष्टी एकत्र अनुभवायला मिळणार आहेत. ज्यामध्ये रॅप, हिप-हॉप संगीत आहे. मुंबईच्या झुग्गी-झोपडीमध्ये राहणाऱ्या दोन लोकांची ही गोष्ट आहे. जे नंतर देशातील मोठे रॅपर बनले.