Sonakshi Sinha Rumoured Boyfriend: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या एका नव्या व्यवसायामुळं चर्चेत आली. सोनाक्षीचा हा व्यवसाय होता, नेल आर्टचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाजगतात सक्रिय असतानाही सोनाक्षीची ही नवी इनिंग बरीच चर्चेत आली आहे. बरं, इतकंच नव्हे तर आता तिचं खासगी आयुष्यही या चर्चांमध्ये जागा मिळवताना दिसत आहे. 


नुकताच सोनाक्षीचा वाढदिवस पार पडला. यावेळी तिला कलाजगतातील बऱ्याच सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या. पण, एका व्यक्तीच्या शुभेच्छा तिच्यासाठी जरा जास्तच खास होत्या. बरं, या शुभेच्छा उशिरानं देऊनही तितक्याच खास ठरत आहेत. 


ही खास व्यक्ती म्हणजे जहीर इकबाल (Zaheer Iqbal). गेल्या बऱ्याच काळापासून सोनाक्षी आणि जहीरला एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यावरूनच त्यांच्या नात्याविषयीचे विविध तर्कही लावले गेले. 


आता सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त जहीरनं तिच्यासोबतचा फोटो, व्हिडीओ पोस्ट करत हे नातं जगासमोर आणलं. 



सोनाक्षीच्या वाढदिवसानंतर तिला शुभेच्छा देत जहीरनं लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनाज. धन्यवाद, मला न मारण्यासाठी. I love you.... तुला खुप सारं प्रेम, खाणं, विमानानं फिरण्याचा आनंद, प्रेम मिळो'.


हा व्हिडीओच तुम्हाला सांगतोय की आम्ही एकमेकांना नेमके कधीपासून ओळखतोय, असं लिहित त्यानं कसलासा इशाराही दिला.