मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबई येथील घरी तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या सरकारी बंदुकीमधून एक गोळी फायर झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी नाही झालं. एका अधिकाऱ्याने म्हटलं की, जुहूमधील सिन्हा यांच्या घरी 28 जुलैला संध्याकाळी ही घटना घडली. सुरक्षारक्षण बंदुक हाताळत असतांना अचानक एक गोळी फायर झाली. बिहारच्या पटनामधून लोकसभा खासदार असलेले 72 वर्षीय सिन्हा 'रामायण' या अपार्टमेंटमध्ये राहतात. ते माजी केंद्रीय मंत्री देखील होते.


सिन्‍हा यांची भाजपवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 जुलैला मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्‍वास ठरावावर चर्चा सुरु असताना यादरम्यान काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली होती. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्राच अनेक लोकांची गळाभेट घेतात. जर राहुल गांधी यांनी गळाभेट घेतली तर त्यात काय वेगळं केलं.


राहुल गांधी यांची गळाभेट आनंदाने स्विकारायला हवी होती. राहुल गांधींच्या गळाभेटीचं त्यांनी समर्थन केलं. पण भाजपने मात्र यावर उलट प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधींवर त्यांनी टीका केली होती.