मुंबई :  Indian Idol 12 या कार्यक्रमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कायम चर्चेत असणारा हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. यावेळी वादाचा कारण ठरली आहे ती या कार्यक्रमातील स्पर्धक शनमुखप्रिया. शनमुखप्रियाला कार्यक्रमातून काढून टाकण्याची मागणी युझर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. त्याला कारण आहे गेल्या आठवड्यात प्रसारित झालेला एपिसोड. गेल्या आठवड्यात मंचावर ख्यातनाम संगीतकार दिवंगत श्रवण यांना आदरांजली वाहण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शनमुखप्रिया 'हमको सिर्फ तुमसे प्यार है' हे गाणे सादर केलं. शनमुखप्रियाने हे गाणं अतिशय वाईट पद्धतीत सादर केलं असा आरोप तिच्यावर केला जात आहे. शनमुखप्रियाने गायलेलं हे गाणं रसिकांना आवडलं नाही, त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. एका युझरने लिहिले की, 'शनमुखप्रिया गाणे गात नाही तर ती फक्त ओरडते. तिच्या आवाजात गोडपणा नाही. ती गाणं गाते म्हणजे ती गाण्याची खिल्ली उडवते.'



तर एक युझरने तिला कार्यक्रमाबाहेर काढण्याची मागणी केली आहे. 'शनमुखप्रिया  अतिशय वाईट गायक आहे. तिला काढून टाका नाहीतर कार्यक्रम बंद करा. आता शनमुखप्रियामुळे कार्यक्रम आवडेनासा झाला आहे...' त्यामुळे शनमुखप्रिया आणि Indian Idol 12  कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.



दरम्यान किशोर कुमार यांच्या विशेष भागात अमित कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. पण त्यानंतर आपल्याला कार्यक्रमा आवडला नाही. असं त्यांनी सांगितलं. शिवाय स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी निर्मात्यांनी माझ्यावर दबाव टाकण्यात आला असं देखील अमित कुमार म्हणाले.