या वादग्रस्त सिनेमांचा `कोटींचा गल्ला`
वादांमूळे हे सिनेमा चांगला गल्ला कमावतात हेही दिसून आले आहे. अशाच काही सिनेमांवर नजर टाकूया..
मुंबई : पद्मावती सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात असल्याने त्याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. अनेक चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात अडकल्याने चर्चेत येतात. पण या वादांमूळे हे सिनेमा चांगला गल्ला कमावतात हेही दिसून आले आहे. अशाच काही सिनेमांवर नजर टाकूया..
उडता पंजाब
शाहीद कपूर, आलिया भट्ट, करिना कपूर आणि दिलजीत दोसांझ अशा मल्टीस्टार्सना घेऊन पंजाब मधील नशेच्या समस्येला अधोरेखित करण्यात आले. उडता पंजाब नावाच्या या सिनेमाने ६० कोटींची कमाई केली होती.
रईस
पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान हिला सिनेमात घेतल्याने वाद निर्माण झाला होता. शाहरुख खानच्या या सिनेमाने एकूण १२८ कोटींचा गल्ला जमवला.
राम-लीला
संजय लीला भंसाली यांनी रणवीर-दीपिका यांना घेऊन तयार केलेला सिनेमा रामलीला. चित्रपटाच्या नावावरुन वाद निर्माण झाला. त्यानंतर सिनेमाने
११२ कोटी रुपयांची कमाई केली.
पी.के
देवी-देवता आणि श्रद्धा, अंधश्रद्धा विषयावर भाष्य करणारा पी.के प्रदर्शनाआधीच चांगलाच चर्चेत राहिला. अनेक धार्मिक संघटनांनी याला विरोध केला. याचा परिणाम सिनेमानाला ३३७ कोटी मिळवून दिसला.
ऐ दिल है मुश्किल
या मल्टिस्टारकास्ट फिल्ममध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याला घेतल्याने निषेध नोंदविण्यात आला. पण सिनेमा रिलीज झालाच आणि १०६ कोटींची कमाईही झाली.
जॉली एलएलबी २
अक्षय कुमारची फिल्म जॉली एलएलबी सिनेमाला काही वकीलांनी विरोध केला होता. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने १०७ कोटींचा गल्ला गोळा केला.
लिप्स्टिक अंडर माय बुरखा
या सिनेमाला सेंसॉर बॉर्डने चांगलीच कात्री लावली होती. ४ महिलांच्या आयुष्यावर आधारित सिनेमान १६.५ कोटी रुपयांची कमाई केली.