मुंबई : कोरोनाव्हायरसमुळे सगळी़कडे लॉकडाऊन आहे. यामुळे सिनेसृष्टी पूर्णपणे ठप्प आहे. बॉलिवूड कलाकार देखील घराबाहेर पडत नाही आहे. अशातच पेपराजी कव्हर कऱणाऱ्या फोटोग्राफर्सचं काम संपूर्ण बंद झालं आहे. ३६ हून अधिक पपाराजीचे फोटोग्राफर सध्या घरीच आहे. अशावेळी एकता कपूर त्यांच्या मदतीकरता धावून आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पपराजीचं अकाऊंट हँडल करणाऱ्या विरल भयानीने Zee Newsला दिलेल्या माहितीमध्ये हे सांगितलं. पपाराजी फोटोग्राफरला एकता कपूरने मदत केली आहे. भयानी यांच्या अकाऊंटमध्ये १५ लोकांकरता पैसे पाठवले आहेत. पापाराजी कव्हर करणारी जवळपास ३८ ते ४० मंडळी आहेत. पण तुर्तास एकता कपूरने १५ लोकांना मदत केली आहे. 



बॉलिवूड कलाकारांना पापाराजी सगळीकडे फॉलो करत असतात. अगदी त्यांच्या जिमपासून ते अगदी एअरपोर्टपर्यंत हे पापाराजी फॉलो करत असतात. एवढंच नव्हे तर ही कलाकार मंडळी कुणासोबत कोणत्या रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटला जातात याचे फोटो यांच्याकडे असतात. 



एकता कपूरचे योगेन शाह, मानव मंगलानी यांनी देखील आभार मानले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहेत. सगळ्यागोष्टी लॉकडाऊनमुळे ठप्प झाला आहे. ३ मे पर्यंत हा लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असलेल्या प्रत्येकाची गैरसोय होत आहे.