Coronavirus : सोनाली कुलकर्णीची सरकारला विनंती, पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना
कोरोनाकाळात सोनालीला सरकारकडून ही अपेक्षा
मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी प्रत्येकाला आपल्या जवळच्या माणसांची काळजी वाटत आहे. प्रत्येकजण सुरक्षित राहावं यासाठी सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात केली आहे. मात्र आता लसीकरण मोहीम थांबवण्यात आली आहे. (Sonalee Kulkarni request to State Government) अशावेळी सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस मिळावी, अशी विनंती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सरकारला केली आहे.
सोनाली कुलकर्णीने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या आई-वडिलांचा फोटो शेअर केला आहे. सोनालीच्या आई-वडिलांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेतली आहे.
सोनाली आपल्या पोस्टमध्ये लिहिते
Verified.. माझ्या आई बाबांचं लसीकरण झालंय..
#lockdown होईल किंवा होणारही नाही,
ते आपल्या हातात नाही.
पण आपली सुरक्षितता ही केवळ
आपली जबाबदारी आहे.
काळजी घेऊयात,
आपली आणि आपल्या कुटुंबाची
P.S. आता लसीकरण सरसकट सगळ्यांसाठी
सुरू व्हायला हवं हीच विनंती
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. आता सध्या सोनाली वीकेंड लॉकडाऊनदरम्यान घरातच धमाल करत आहे. नुकतंच सोनालीनं काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘घर आहे तिथं प्रेम आहे…’ असं कॅप्शन तिनं आपल्या पोस्टला दिलं आहे.
लवकरच सोनाली 'झिम्मा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून, चाहत्यांमध्ये सोनालीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहण्याची आतुरता वाढली आहे.