मुंबई : नटरंग पासून हिरकणी पर्यंत ज्या  अभिनेत्रीने  तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने केवळ महाराष्ट्रालाचं  नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतःच्या प्रेमात पाडले , अशी आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  ही या लॉक डाउन च्या काळात तिच्या चाहत्यांसाठी एक वेगळी ट्रीट घेऊन येत आहे . असं म्हणतात  या जगात आपल्या सर्वांकडे दोन चेहरे असतात . एक चेहरा जो घेऊन आपण  समाजात सर्वत्र वावरत  असतो आणि दुसरा चेहरा  जो केवळ आपल्या आयुष्यातील खूप खास लोकांना माहीत  असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोरंजनाच्या क्षेत्रात असताना कलाकारांना सुद्धा असे दोन चेहरे घेऊन त्यांच्या चाहत्यांसमोर जावं लागत आणि खरा चेहरा झाकावा लागतो . मात्र सोनाली कुलकर्णी हीची ओळख नेहमीच एक विद्रोही प्रकारच्या कलाकारांमध्ये मोडते. अतिशय कठीण भूमिका ती स्वतः शोधते आणि कोणीही कधीही करू शकणार नाही अशा प्रकारे ती त्या भूमिका निभावून एक इतिहास बनवते. तिने केलेल्या प्रत्येक भूमिका दिसायला सोप्या असल्या तरीही निभवायला कठीणच होत्या पण तिने पूर्ण मेहनत घेऊन त्या उत्तम  तर्हेने वठवल्या. हीच सर्वांची आवडती सोनाली कुलकर्णी तिच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आता  तिच्या आवाजासोबत  डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहे.  हॅशटॅग कनेक्ट या कंपनीने या  लोककडाऊन च्या काळात सोनालीच्या चाहत्यांसाठी एक वेगळी भेट देऊ केली आहे.


हब हॉपर या ऍप च्या माध्यमातून 'सांगते ऐका ' हा एक नवा कोरा  कार्यक्रम  ते घेऊन आले आहेत . हॅशटॅग कनेक्ट ने सोनाली ला हब हॉपर या ऍप शी कनेक्ट करून या  पॉडकास्टची निर्मिती केली आहे.  या ऍप च्या  माध्यमाने ती प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे.तिच्या आयुष्यातील  कोणालाही न माहित असलेल्या , न ऐकलेल्या अशा घटना ज्या तिने आजवर कोणाकडेही सांगितल्या नाहीत किंवा कोणत्याही मुलाखतीत  मध्ये याबद्दल भाष्य केलं नाही  अशा काही महत्वाच्या गोष्टी   ती दिनांक १५ एप्रिल पासून हब हॉपर या ऍप च्या माध्यमातून तिच्या प्रेक्षकांना सांगणार आहे. एक साधारण मुलगी ते एक सेलेब्रिटी पर्यंतचा तिचा प्रवास तिच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 



ज्यांना पॉडकास्ट म्हणजे काय हे माहित नसेल त्यांच्यासाठी , आपण ज्या प्रमाणे लहानपणी एक डायरी लिहायचो स्वतःबरोबर घडलेल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपण  त्या डायरीत साठूवून ठेवायचो  आणि ती डायरी कोणाच्याही हातांत पडणार नाही याची काळजी घायचो त्याचप्रकारची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची स्वतःची , तिच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट अनुभवांची , आयुष्यात भेटलेल्या चांगल्या वाईट माणसे मग ते मनोरंजन क्षेत्राशी निगडित असतील किंवा राजकारणी  अशा आयुष्यात भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या अनुभवांबद्दल पहिल्यांदाच एका ऑडिओ डायरी द्वारे स्वतःच्या आवाजात सर्व रेकॉर्ड करून ती सांगणार आहे. हॅशटॅग कनेक्ट  या कंपनीने जसे सोनाली कुलकर्णी चा पॉडकास्ट तयार केला तसाच आणखीही काही नावाजलेल्या कलाकारांचे पॉडकास्ट पॉडकास्ट तयार करणार आहेत. हॅशटॅग कनेक्ट ही कंपनी अनेक नवनवीन आणि  क्रिएटिव्ह लोकांना एक प्लॅटफॉर्म देत आहे. हॉब हॉपर प्रमाणेच हे आपल्याला हे पॉडकास्ट स्पोटिफाय , एपल  आणि  गूगल अँड्रॉइड वर सुद्धा ऐकायला मिळणार आहे.



या पॉडकास्ट बद्दल  सोनाली कुलकर्णी ला विचारले असता तिने सांगितले , ' मला कधीच दोन चेहरे घेऊन वावरायला नाही आवडत. मी जे सुद्धा करते ते अगदी सरळ आणि सर्वांच्या समोर करते. काही गोष्टी सांगण्यासाठी मात्र योग्य वेळेची वाट पाहावी लागते आणि मला वाटतं आता ती वेळ आली आहे. कलाकाराचं आयुष्य हे किती चढउतारांचं असतं हे तुम्हाला माझा पॉडकास्ट ऐकून समजेल ही आशा करते आणि त्यांनतर सुद्धा तुम्ही माझ्यावर असेच प्रेम करत राहा ही सर्व माझ्या चाहत्यांना विनंती करते. ' 


तर लवकरात लवकर हब हॉपर आणि इतर नमूद विविध ऐप डाउनलोड करा आणि १५  एप्रिल पासून हॅशटॅग कनेक्टच्या कल्पनेमुळे सोनाली कुलकर्णी चे खरे आयुष्य उलगडण्याची  वाट पहा!