मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज 'मोतीचूर' चित्रपटावर स्थगिती आणली आहे. १० ऑक्टोबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार होता. 'मोतीचूर' चित्रपटात अभिनेत्री अथिया शेट्टी आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाची कथा देव मित्र बिस्वाल यांची आहे. बिस्वाल यांनी या कथेसाठी चक्क पाच वर्ष मेहनत घेतली आहे. परंतु चित्रपट निर्मात्यांकडून त्यांना पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाकी रक्कम न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे बिस्वाल यांनी चित्रपट निर्माता बुपडीकर मुव्हिज प्रायवेट लिमिटेडने त्यांना थकीत रक्कम दिली नाही. त्यामुळे चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित न करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 


बिस्वाल यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात ११ लाख रूपये देण्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. परंतु त्यांना फक्त ६ लाख रूपये दिले आहेत. निर्मात्यांकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.


२६ एप्रिल २०१८ मध्ये 'मोतीचूर' चित्रपटाचा करार करण्यात आला होता. बिस्वाल यांना त्यांच्या कामाचे श्रेय मिळायलाच हवे असं त्यांचे वकील ध्रुती कपाडिया यांचे म्हणणे आहे. चित्रपटाचं ९० टक्के काम झाल्याचे समोर येत आहे.