मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor khan) यांचा 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. लाल सिंग चड्ढा हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच वादात सापडला आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स सातत्याने चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पानेसरने देखील या सिनेमावरुन टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट पाहिल्यानंतर मॉन्टी पनेसर (Monty Panesar)चांगलाच भडकला आहे. 'लाल सिंग चड्ढा'मध्ये भारतीय लष्कर आणि शीखांचा अपमान करण्यात आला आहे. असं त्याने म्हटलं आहे. 


मॉन्टी पानेसर याने चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर म्हटले की, 'फॉरेस्ट गंप' मधील टॉम हँक्सचे कमी IQ पात्र योग्य होते कारण अमेरिका व्हिएतनाम युद्धादरम्यान कमी IQ पुरुषांची भरती करत होती. हा चित्रपट भारताच्या सशस्त्र दलांचा, भारतीय लष्कराचा आणि शीखांचा अपमान करतो ! संतापजनक. लज्जास्पद. #BycottLalSinghChadda


मॉन्टी पनेसर पुढे लिहितो की, 'आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा'मध्ये एका मूर्खाची भूमिका साकारली. फॉरेस्ट गंप सुद्धा कमी बुद्धीचा माणूस होता!! आक्षेपार्ह. लज्जास्पद.' 



लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 


माँटी पानेसर हा स्वतः शीख असून त्याचे आई-वडील भारतीय आहेत. मॉन्टी पानेसर हा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे. त्याने इंग्लंडकडून 50 कसोटी आणि 26 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 167 आणि 24 विकेट घेतल्या आहेत.