मुंबई : सोनी टीव्ही वरील सीआयडी (CID) मालिकेने 20 वर्षांचा प्रवास पूर्ण केलायं. पण आता या मालिकेचे काही शेवटचे भाग आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या दिवसात ही मालिका बंद करण्यात येणार आहे. बी.पी.सिंग आणि प्रदीप उपौर यांनी या मालिकेची निर्मिती केली. फायरवर्क्स प्रोडक्शन अंतर्गत या मालिकेने 1,546 एपिसोड पूर्ण केले. शनिवार आणि रविवार रात्री 10.30 वाजता सोनी टीव्ही वर दिसणारी ही मालिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर उचलून धरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळेच या मालिकेने इतके वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. tellychakkar या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिलंय. 27 ऑक्टोबर या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.


मालिकेचं यश


या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न आणि दया यांचे कॅरेक्टर अनेक सिनेमात दिसले. अनेक कॉमेडी शो, स्टे शो मध्येही ही नावं वापरली जातात. चोर-पोलीस असा संदर्भ देण्यासाठी या नावांचा किंवा मालिकेचा संदर्भ बऱ्याचदा घेतला जातो. या सर्वांमध्येच या मालिकेचं यश आहे.


चाहत्यांमध्ये नाराजी 


या सर्वामुळेच मालिकेची 20 वर्षे कधी पूर्ण झाली हे प्रेक्षकांनाही कळालं नाही.


नव्वदीमध्ये जन्मलेल्या पिढीने या मालिकेचे सर्व टप्पे पाहिले आहेत.


पण आता ही मालिका बंद होत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे.


ही मालिका बंद व्हावी असं कोणालाही वाटत नाही.


आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी, दिनेश, श्रद्धा मुसळे, अंशा सय्यद आणि नरेंद्र गुप्ता हे कलाकार देखील 20 वर्षांहून अधिक काळ मालिकेशी जोडले गेले आहेत.