मुंबई : प्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिगेज (Georgina Rodríguez) मुळे कायम चर्चेत असतो. रोनाल्डोची गनना जगातील सर्वात उत्तम खेळाडूंमध्ये होते. एका रिपोर्टनुसार, रोनाल्डो फार आलिशान आयुष्य जगतो. शिवाय त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिगेज देखील रॉयल आयुष्य जगते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिगेजवर महिन्याला जवळपास 80 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करतो. रिपोर्टनुसार रोनाल्डो गर्लफ्रेंडला महिन्याला 83,000 पाउंड म्हणजे जवळपास 82 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे देतो. 



ही रक्कम जॉर्जिना रॉड्रिगेज आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी असते.  जॉर्जिना रॉड्रिगेज बद्दल सांगायचं झालं तर, ती एक मॉडेल आहे. तिचे अनेक मोठ्या ब्रँड्सची जाहिरात देखील केली आहे. 



सोशल मीडियावर तिचे 36.6 मिलियन फॉलोलर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट असतात. ती सतत सोशल मीडियावर फोटोआणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 


काही दिवसांपूर्वी, रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिनाला दीड कोटींची कार गिफ्ट केली होती. रोनाल्डो आणि जॉर्जिना आलिशान आयुष्य जगतात. याची झलक जॉर्जिनाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळते. जॉर्जिना आणि रोनाल्डो 2016 पासून एकत्र आहेत.


रोनाल्डोच्या भेटी पूर्वी जॉर्जिना एका दुकानात काम करत होती. तेव्हा फक्त 100 रुपयांवर ती काम करत होती. तेव्हा रोनाल्डो स्पॅनिश क्लब रिअल मॅड्रिडकडून खेळत असे. आता ती रोनाल्डोसोबत त्याच्या गल्फस्ट्रीम G-20 विमानात फिरते.