मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी  (Sridevi) यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबत फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून कोणीतरी चार लाख रुपये लंपास केले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलिसांनी बुधवारी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात बोनी कपूर यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी बँकेकडे विचारणा केली असता त्यांना फसवणूक झाल्याची माहिती मिळाली. याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे.


दरम्यान, बोनी कपूर यांच्याकडून कोणीही क्रेडिट कार्डची माहिती मागितली नसल्याचं देखील बोनी कपूर यांनी सांगितलं आहे. परंतु कार्ड वापरताना कोणीतरी डेटा मिळवला असल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


एवढंच नाही, तर 9 फेब्रुवारी रोजी सायबर फ्रॉडने पाच व्यवहार करून बोनी यांच्या खात्यातून 3 लाख 82 हजार रुपये ट्रान्सफर केले. बोनी कपूर यांच्या खात्यातील पैसे गुरुग्राममधील एका कंपनीच्या खात्यात गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.