`स्वागत नही करोगे हमारा...`, दमदार `दबंग ३`ची पहिली झलक
सलमान खानची दबंगगिरी चाहत्यांना लवकरच अनुभवता येणार.
मुंबई : "स्वागत नहीं करोगे हमारा..." असे म्हणतं बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची दबंगगिरी चाहत्यांना लवकरच अनुभवता येणार. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. सलमान सध्या 'दबंग ३' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तरी वेळात वेळ काढून त्याने चित्रपटाचा अधिकृत मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे. खुद्द सलमान त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे.
चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करत त्याने कॅप्शनमध्ये '१०० दिवसांनंतर चुलबूल रॉबिनहुड पांडे..' असे लिहिले आहे. म्हणजे १०० दिवसांनंतर 'दबंग ३' चित्रपटगृहात धडकणार आहे. चित्रपटच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'दबंग ३' चित्रपटाबरोबरच अर्जुन कपूरचा 'पानीपत' चित्रपट ६ डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्याचबरोबर १३ डिसेंबरला अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी' आणि २७ डिसेंबरला अक्षय-करिनाचा 'गुड न्यूज' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर कोणता चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.