मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'दबंग ३' चित्रपटाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहे. चित्रपटात सलमान मुख्य भूमिकेत झळकणार आहे, पण इतर भूमिकांसाठी कोणते कलाकार झळकणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे चित्रपटातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आयटम सॉन्गचेचित्रीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यंदाच्या भागात 'मुन्नी बदनाम हुई' गाण्याची जागा 'मुन्ना बदनाम हुआ' गण्याने घेतली आहे. या गाण्यावर सलमानसह कोण  थिरकणार यावरून अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे चित्रपटात चुलबूल पांडे आणि चंकी पांडे या दोन भावांच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका अभिनेते विनोद खन्ना यांनी साकारली होती. पण विनोद खन्ना यांच्या निधना नंतर त्यांच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते 


धर्मेंद्र यांच्या नावाला पसंती देण्यात येत आहे. दबंगच्या दोन्ही भागांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्यामुळे चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता वाढली आहे. सध्या सलमानचा 'भारत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच मुसंडी मारताना दिसत आहे. 'भारत' पाठोपाठ 'दबंग ३' चित्रपट किती रूपयांची मजल मारेल हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.