सलमान म्हणतो, `बडे आदर से निकली यू करके...`
`दबंग ३` चित्रपटाचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.
मुंबई : 'बडे आदर से निकली यू करके...' बहुचर्चीत 'दबंग ३' चित्रपटाचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. परंतु गाण्याचा व्हिडिओ अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेता सलमान खान स्टारर चित्रपटाची उत्सुकता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे हे गाणं सलमानच्या वाजात स्वरबद्द करण्यात आलं आहे.
त्याचप्रमाणे गायक पायल देवने देखील 'यू करके' गाण्याला आपला आवाज दिला आहे. 'हे गाणं माझ्यासाठी फार खास आहे. कारण या गाण्याच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच सलमानसोबत काम करत आहे आणि हे गाणं चाहत्यांना नक्की आवडेल.' अशा भावना तिने यावेळेस व्यक्त केल्या.
प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. सलमानने या गाण्याला आवाज दिल्यामुळे चाहते चांगलेच आनंदी झाले आहेत. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या 'हॅलो ब्रदर' चित्रपटात त्याने गाणं गायलं होतं.
त्यानंतर 'किक' आणि 'हिरो' चित्रपटातील गाण्यांना त्याने आवाज दिला होता. तेव्हा त्याच्या आवाजाला चाहत्यांनी पसंती दर्शवली होती. 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.