मुंबई : बॉलिवूडमध्ये रिलेशनशिपच्या चर्चा सर्रास रंगत असतात. प्रत्येक चाहत्याला त्यांच्या आवडतीच्या कलाकाराच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. सध्या दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या खासगी अयुष्याबद्दल चांगलीच चर्चेत आहे. तिच्या आयुष्याचा मिस्टर परफेक्ट कोण आहे याबद्दल तिच्या सर्वच चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या आधी सुद्धा तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आले. पण सोनाक्षी नेहमी आपण सिंगल असल्याचे दावा. परंतू आता ती रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये सोनाक्षीच्या जवळपास सर्व मित्रमंडळींना त्यांचा जीवनसाथी भेटला आहे. परंतू सोनाक्षी अद्यापही तिच्या जोडीदाराच्या प्रतिक्षेत आहे. जोडीदाराची कमी सध्या सोनाक्षीला भासताना दिसत आहे. पण सोनाक्षी म्हणते ती प्रेमाची प्रतिक्षा करत नाही, तर तिचे प्रेम तिला शोधत येईल. 


मिस्टर परफेक्ट बद्दल उघडपणे बोलताना म्हणते की, 'मझ्या अनेक मित्रमंडळींना त्यांचे जोडीदार भेटले आहेत. मी त्या सर्वांसाठी प्रचंड खुश आहे. पण आता मला असा अनुभव आला आहे की, मी ज्या गोष्टीचा पाठलाग करते, ती गोष्ट माझ्या हातून निसटते. मी एका सामान्य मुली प्रमाणे जोडीदाराचे स्वप्न पाहते, रिलेशनशिपमध्ये रहायला मला आवडतं'


पुढे सोनाक्षी म्हणाली , 'मला माझ्या आयुष्यात जोडीदाराची कमी भासत आहे. पण आता मी प्रेमाच्या प्रतिक्षेत नाही. माझ प्रेम स्वत:चालत माझ्या पर्यंत येईल' तर सोनाक्षीचा मिस्टर परफेक्ट कधी तिच्या आयुष्यात येईल हे पाहणे सर्वांसाठी उत्साहपूर्ण असणार आहे. 


सोनाक्षी सध्या तिचा बहुप्रतिक्षीत 'दबंग ३' चित्रपटाच्या चित्रीरकणात व्यस्त आहे. तर २ ऑगस्ट रोजी तिचा 'खानदानी शफाखाना' सुद्धा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता यांनी केले आहे.