मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. 'राधे' आणि 'दबंग ३' चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. परंतु आता त्यांचा 'दबंग-३' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील 'हुह-हुड' गाण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या स्थगितीची देखील मागणी करण्यात येत आहे. या गाण्याच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रिपब्लिक वर्ल्डच्या एका रिपोर्टनुसार, हिंदू जनजागृती समितीने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे या चित्रपटाला सर्टिफिकेट न देण्याची मागणी केली आहे. चित्रपटाचं टायटल सॉन्ग 'हुड-हुड' गाण्यामध्ये हिंदूंच्या भावनांना ठेस पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समितीने सांगितलं आहे. 


हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि झारखंडचे अध्यक्ष सुनील घंवात यांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. 'हुड-हुड दबंग या गाण्यामध्ये ऋषींची अवहेलना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाण्यामध्ये त्यांना अयोग्यरित्या नृत्य करताना दाखवण्यात आल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. 


याठिकणी त्यांनी एक प्रश्न देखील उपस्थित केला. ' गाण्यामध्ये मुल्ला-मौलावी किंवा फादर यांना अशा नृत्य करताना दाखवण्याची हिंमत सलमानकडे आहे का?' आता त्यांच्या या प्रश्नावर 'दबंग ३' चित्रपटाच्या टीमकडून काय उत्तर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.