मुंबई : मुंबईतील गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लग्नगाठ बांधली. साध्या पध्दतीने दगडी चाळीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. योगिता आणि अक्षय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. दोघेही आपल्या डेली लाईफमधील हॅपी मुव्हमेंट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अक्षय व योगिता यांच्या घरात 7  मे रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर अरुण गवळी यांच्या नातीला पाहण्याची सगळ्यांचीच इच्छा होती. अखेर अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पहिल्यांदाच मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. मुलीचे नाव 'अर्णा' असं  ठेवण्यात आलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अक्षय आणि योगिता यांचा मुलीसोबतचा फोटो आणि डॅडींसोबत नातीचा फोटो अक्षयने नुकताच शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.