VIRAL DAHIHANDI PHOTO OF SHRADHA KAPOOR WITH CM EKNATH SHINDE: अभिनेत्री श्रद्धा कपूर(SHRADDHA KAPOOR) खूप कमी पैपराजीच्या फोटोस मध्ये स्पॉट होते ,पण आज मात्र सर्व कॅमेऱ्याच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या कारणही तसच खास होत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दहीहंडीचा उत्सव सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होतोय ठिकठिकाणी सेलेब्रिटींचं आगमन होतंय बालगोपाळांचा उत्साह आणखी वाढतोय.


कोरोनामुळं तब्बल दोन वर्षं दहीहंडी सण साजरा करता येत न्हवता पण यंदाच्या वर्षी ढाकुम्माकुमच्या तालावर दहीहंडीचा थरार चांगलाच रंगणार आहे.


कारण मुंबई-ठाण्यात लाखमोलाच्या हंड्या बांधण्याची स्पर्धाच शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट, भाजप आणि मनसेमध्ये सुरू झालीय. यानिमित्तानं हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची बरसात होताना दिसत आहे.


हेही वाचा: Trending video of alia bhatt:PREGNANT Aliaसोबत Ranbeerनं असं नको करायला हवं होत! चाहतेही संतापले


श्रद्धा कपूरने नुकतीच मुंबईतील एका दहीहंडी इव्हेंट ला हजेरी लावली होती यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत ती सुद्धा उपस्थित होती.


यावेळी श्रद्धाच ग्रँड वेलकम करण्यात आलं .ऑरेंज रंगाच्या सलवार सूटमध्ये श्रद्धा खूप सुंदर दिसत होती याचे काही फोटोस सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत.



शिवाय यावेळी श्रद्धाने खास तिच्या शैलीत मराठीमध्ये गोविंदांसोबत संवाद साधला त्याचा हि व्हिडीओ सध्या चांगलाच पहिला जातोय



सगळीकडेच दहीहंडीची चुरस पाहायला मिळतेय एकापेक्षा एक आकर्षक बक्षीस,इव्हेंट्सचं आयोजन करण्यात आलं आहे.


ठाण्यातल्या टेंभी नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दहीहंडी उत्सव रंगणार आहे. उंच हंड्या फोडणाऱ्या गोविंदा पथकांना अडीच लाख रुपये, तर महिला गोविंदा पथकाला 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.


आमदार प्रताप सरनाईक यांनी दहा थर लावणाऱ्या गोविंदाला पथकाला 21 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय.