सोनाक्षी सिन्हाची लग्न पत्रिका पाहता डेझी शाह म्हणाली, `शत्रुघ्न जी योग्य होते, आजकालची मुलं...`
Daisy Shah on Sonakshi Sinha and Zaheer Iqbal`s Wedding Card : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या पत्रिकेविषयी बोलताना डेझी शाहनं घेतलं शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव...
Daisy Shah on Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. खरंतर चर्चांनुसार, सोनाक्षी ही 23 जून रोजी लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड झहीर इकबालशी लग्न बंधनात अडकणार आहे. तिचं डिजिटल लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर आता अभिनेत्री डेजी शाहनं तिची प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची सगळीकडे चर्चा सुरु असताना डेझी शाहला इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना डेझी शाहला सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तर तिनं सांगितलं ज्या लोकांना माहित होतं त्यांना आश्चर्य झालं नाही आणि त्यांच्यापैकी मी एक आहे. वेडिंग कार्डविषयी बोलताना पुढे डेझी म्हणाली कोणाला आमंत्रण देण्याची एक चांगली पद्धत आहे. मला तर हे खूप आवडलं. हे कोणत्याही पारंपारिक लग्नाच्या पत्रिकेसारखं नाही. त्यांनी बॅकग्राऊंडला स्नो ठेवलं आहे. हे फार मॉर्डन आणि फ्रेश आहे. आजकालच्या काळाप्रमाणे आहे. जसं सोनाच्या वडिलांनी सांगितलं आजकालची मुलं माहिती देतात, परवानगी मागत नाहीत. त्यासाठी हे अगदी बरोबर आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबालच्या डिजिटल वेडिंग कार्टमध्ये सोनाक्षी आणि जहीर एका ऑडियोच्या मदतीनं त्यांच्या मित्रांना पत्रिका पाठवत आहेत. त्यात ते म्हणत आहेत की आमच्या सगळ्या अद्भुत, टेकनीक लव्हर आणि गुप्तहेर मित्र आणि कुटुंबियांना, जे इथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत, सगळ्यांना नमस्कार. गेल्या सात वर्षात एकत्र असण्यापासून, प्रेम, आनंद, हसणं आणि अनेक अॅडव्हेंचर आम्हाला इथपर्यंत घेऊन आले आहेत. एकमेकांचे रुमर्ड गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असण्यापासून आम्ही एकमेकांचे अधिकृत पती-पत्नी होणार आहोत. तर तुमच्याशिवाय हे अपूर्ण आहे. त्यामुळे 23 जून रोजी तुम्ही जे काही करत असाल ते सगळं सोडा आणि आमच्या या सोहळ्यात सहभागी व्हा.
दरम्यान, त्या दोघांच्या लग्नाच्या सोहळ्यात अनेक लोक हजेरी लावणार आहेत. त्यात हनी सिंगचं देखील नाव आहे. तर सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर तर त्यांच्या या सोहळ्यात प्रॉपर ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. सगळ्यांना फॉर्मल परिधान करण्यास सांगितलं असून लाल रंगाचे कपडे परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर या कार्यक्रमात अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत इतर सुपरस्टार देखील हजेरी लावणार आहेत.