मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' या सिनेमावरून खूप मोठा वाद पेटला आहे. या सिनेमावर टीका केल्याप्रकरणी दलित तरूणाला चक्क मंदिरात नाक घासायला लावलं आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर त्या तरूणाला मारहाण देखील केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूण हा राजेश कुमार मेघवाल एका खासगी बँकेत नोकरी करतो. 


सोशल मीडियावर 'द काश्मीर फाइल्स' सिनेमावर टीका करणारी एक खासगी टिप्पणी केली. याबाबत हिंदू देवतांकरता अपमानास्पद टिप्पणी केली होती. 


तरूणाच्या या कृत्यावर नाराज होत काही लोकांना त्याला मारहाण केली आहे. एवढंच नाही तर तरूणाला एका मंदिरात नाक घासायला जबरदस्ती केली. 


ही घटना मंगळवारी बहरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर यातील दोघांना अटक करण्यात आलं आहे. 


बहरोडचे सीओ आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कुमारने दोन ते तीन दिवसांपूर्वी फेसबुकवर टिप्पणी केली होती. 


त्याने या सिनेमाविरोधात एक पोस्ट लिहिली होती. अत्याचार का फक्त पंडितांवरच झाला आहे का? दलितांवर झाला नाही का? गरिबांवर रोज अत्याचार होत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी काहीच नाही. 


मेघवालच्या पोस्टमध्ये काही लोकांनी कमेंट करताना म्हटलंय की, 'जय श्री राम' आणि 'जय श्री कृष्ण'. त्याने त्यानंतर आपल्या या पोस्टबद्दल जाहीर माफी देखील मागितली आहे. मात्र काही लोकांनी त्याला मंदिरातच नाक घासायला लावलं.