मुंबई : झी युवा वाहिनीने ‘डान्स महाराष्ट्र डान्स' या महाडान्स स्पर्धेच्या ऑडिशन जाहीर केले आणि या आवाहानाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.


 ५००० ते ६००० स्पर्धकांनी घेतला भाग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांमध्ये झालेल्या ऑडिशन मध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून अनेक स्पर्धंकानी भाग घेतला. विविध गावांमधून आणि शहरांमधून या स्पर्धेत सुमारे ५००० ते ६००० स्पर्धकांनी आपली कला सादर केली. 


प्रेक्षक पसंतीची आशा 


झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की,' डान्स महाराष्ट्र डान्स ऑडिशनला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आम्ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे आभारी आहोत. ज्या प्रमाणे गाण्यावर आधारित 'संगीत सम्राट' या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेम केले त्याच प्रमाणे आता नृत्यशैलींवर आधारित 'डान्स महाराष्ट्र डान्स ' ह्या कार्यक्रमाला सुद्धा महाराष्ट्रातील प्रेक्षक पसंतीची पावती देतील ही आशा आहे.'


२४ जानेवारी पासून सुरू


झी युवा वाहिनीने 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमाच्या प्रत्येक शहरातील ऑडिशनमधून, अतिशय उत्कृष्ट आणि गुणी स्पर्धक निवडले आहेत. येत्या २४ जानेवारी पासून टॉप ९० स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.  हा कार्यक्रम प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ९:३० वाजता झी युवावर प्रक्षेपित होईल.


कलाकार आणि परिक्षकांचे प्रोत्साहन


या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी झी युवा वाहिनीवरील मालिकांतील कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली. सुरुची अडारकर, ऋता दुर्गुळे, यशोमान आपटे, सुयश टिळक, श्रुती अत्रे, क्षितीश दाते, शाल्मली टोळये, कौमुदी वालोकर असे अनेक कलाकार वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहचले. या कलाकारांबरोबरच कार्यक्रमाचे परिक्षक सिद्धार्थ जाधव, आदित्य सरपोतदार आणि फुलवा खामकर यांनीही वेगवेगळ्या शहरांमध्ये येऊन स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. अभिनेता सुव्रत जोशी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार आहे.