मुंबई : महाराष्ट्राची लाडकी वाहिणी झी मराठीवर लवकरच एक नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ सप्टेंबर पासून हा डान्सिंग रिऍलिटी शो येणार आहे. ज्याचं नाव 'डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज' असं आहे. १५ वर्ष आणि त्यावरील अश्या मुली आणि महिलां यात सहभागी झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं वजन ७० किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे स्पर्धत यात दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाट्यलेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला अद्वैत दादरकर या कार्यक्रमाच सूत्रसंचालन करणार आहे. या स्पर्धेचे नृत्यदिग्दर्शन ओंकार शिंदे करणार आहे. तर या वजनदार स्पर्धकांचे परीक्षण सोनाली कुलकर्णी आणि RJ मलिष्का करतील. 


डान्सिंग क्वीन या रिऍलिटी शो च्या माध्यमातून प्रथमच RJ मलिष्का परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा रिऍलिटी शो २४ सप्टेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.