नवी दिल्ली : दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमशी छेडछाड झाल्याची घटना समोर आलीय. दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान ही घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर केला व्हिडीओ


इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन या घटनेचं वास्तव सांगितलंय. विमानात मागे बसलेल्या प्रवाशाने छेड काढल्याचं झायराने या व्हिडीओत सांगितलंय. ही संपूर्ण घटना वर्णन करत असतानाच झायराला रडू कोसळलं. 



 


यावेळी विमानातील कुणीही सहप्रवासी मदतीला आलं नसल्याची खंत तिनं या व्हिडीओत व्यक्त केलीय. मात्र या संपूर्ण घटनेबाबत झायराने अद्याप कोणतीही पोलीस तक्रार केलेली नाही.