मुंबई : 'बाजीराव मस्तानी' नंतर संजय लीला भंसाळींचा 'पद्मावती' हा सिनेमा आता लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. यामधूनच या चित्रपटाच्या भव्यतेची कल्पना येतेय. पद्मावती या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. तर पद्मावतीचे पती रावल रतन सिंगची भूमिका शाहीद कपूर साकारणार आहे तर  रणवीर सिंह अल्लाउद्दीन खल्जीच्या भूमिकेत आहे.  



अल्लाउद्दीन खल्जीची भूमिका साकारणार्‍या रणवीर सिंगचा ट्रेलरमध्ये एकही डायलॉग नाही मात्र त्याच्या डोळ्यातील सूडाग्नी आणि खास लूक लक्ष्यवेधी ठरला आहे.  



रणवीर सिंग पद्मावतीमध्ये 'अल्लाउद्दीन खल्जी'ही नकारात्मक भूमिका साकारत आहे.  



अल्लाउद्दीन खल्जीने चित्तोडगडावर हल्ला केला होता. 



संजय लीला भंसाळीद्वारा दिग्दर्शित पद्मावती १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.