मुंबई : मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या चॅनेलने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केलेनाहीत तर म्युजिक, कॉमेडी आणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक कार्यक्रम टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झीटॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या रविवारी झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांसाठी 'दशक्रिया' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर करणार आहे. प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांची 'दशक्रिया' ही कादंबरी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली, तेव्हा वाचकांचा तिला चांगला प्रतिसाद मिळाला होता. कारण सामाजिक वास्तवाचा एक वेगळाच कोपरा याकादंबरीत उजळून निघाला होता. कादंबरीचं नाव 'दशक्रिया' असलं, तरी दहाव्याच्या विधीपेक्षा, या विधीवर एखाद्या गरिबाचं आयुष्य कसं अवलंबून असतं, याचा शोकांत वेध बाबा भांड यांनी याकादंबरीत घेतला होता.


महत्त्वाचं म्हणजे त्या कादंबरीचा नायक होता एक लहान मुलगा- भानुदास. पैठणला गोदावरीच्या घाटावर दशक्रियेचे विधी होतात, तेव्हा विधीपूर्वी मृत व्यक्तीच्या अस्थि असलेलीराख पाण्याकडे पाठ करुन खांद्यावरुन पिशवीतून पाण्यात सोडली जाते. ती जेव्हा पाण्यात सोडली जाते तेव्हा काही मुलं पाण्यात उभं राहून राखेखाली लोखंडी चाळण धरतात. कधी राख पाण्यातपडली, तर थेट पाण्यात बुडी मारुन राख-माती उपसतात. कारण या राखेत गवसून जातं, रुपया-दोन रुपयाचं एखादं नाणं किंवा क्वचित कधी एखादा सोन्याचा मणी.


भानुदास या अशा मुलांपैकीच एक. कुणाची राख येतेय का ते पाहायचं आणि त्यातून दिवसाकाठी मिळालेल्या पैशातून घर सावरायचं. भानुदासच्या आयुष्यात दशक्रियेच्या विधीमुळे पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरूनका दशक्रिया चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २३ डिसेंबर रविवार दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर.