David Dhawan Challenges Ott Actors : सगळीकडे आता OTT ची चर्चा असते. OTT मुळे आता अनेक कलाकारांना कामाची संधी मिळते. अनेक बडे कलाकार तर मोठ्या पडद्यावर त्यांची जादू केल्यानंतर आता OTT वर येत आहेत. इतकंच नाही तर ज्या लोकांना कुठे संधी नव्हती ते OTT मुळे स्टार झाले असं अनेकदा ऐकायला मिळतं. OTT मध्ये सतत काही तरी नवीव आणि बदल पाहायला मिळतात. आता अनेक चित्रपट हे OTT वर प्रदर्शित झाले आहेत. इतकंच नाही तर प्रेक्षक आता थिएटरला न जाता चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रतीक्षा करताना दिसतात. या सगळ्यावर आता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेव्हिड धवन यांनी नुकतीच अरबाज खानच्या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अरबाजनं त्यांना प्रश्न विचारला की काय ओटीटी आल्यानं चित्रपटांचा चार्म थोडा कमी झाला आहे? यावर उत्तर देत डेव्हिड धवन म्हणाले की ओटीटीवर कोणीही करू शकतं, खरी हिंम्मत तर थिएटरमध्ये दिसते. 


OTT मुळे चित्रपटांचं चार्म संपलं!


डेव्हिड धवननं सांगितलं की 'नाही, चार्म बिल्कुल संपलेलं नाही. एका कलाकारानं मला सांगितलं की काय यार, त्याची काय सेफ्टी असेल. ओटीटीवर चित्रपट केला, चालेल की नाही माहित नाही आणि चालली तर कितीची चालेल. तर मी म्हणालो थिएटरमध्ये ये ना, तुझी लायकी काय ते दाखव. OTT वर कोणीही करू शकतं. घाबरतात, तर लोकं थ्रिएट्रिकल चित्रपट करणार नाहीत. ते मीडिया काय बोलेल याला घाबरतात. तर जेव्हा आमचे चित्रपट हे थिएटरमध्ये प्रदर्शित होतात तेव्हा टाळ्या वाजवल्या जातात. तुमची स्तुती ही फक्त थिएटरपासूनच होते.' 


डेव्हिड धवननं सांगितलं की 'थिएटर मॅन आहे. डेव्हिड धवननं हे मान्य केलं की ओटीटीमुळे निर्मात्यांना एक योग्य आणि सुरक्षित रस्ता मिळतो. तिथे बॉक्स ऑफिसचे आकडे आणि मीडिया स्क्रूटनीपासून ते वाचतात. पण त्या अनुभवाची आणि थिएटरच्या तुलना ही कधीच होऊ शकत नाही.' 


हेही वाचा : मलायका काय काम करते? जेव्हा मुलाला त्याच्या मित्रांनी विचारला प्रश्न, अरहानकडे नव्हतं उत्तर...


मनोज वाजपेयीपासून नवाजुद्दीनं सिद्दीकीपर्यंत अनेक कलाकारांचे चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. त्याशिवाय ते वेब सीरिजमध्ये देखील काम करतात. स्वत: अरबाज खानचा 'पटना शुक्ला' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.