Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या नविन गाण्याचे पोस्टर रिलीज केले होते. यानंतर अमृता यांनी त्यांच्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा भन्नाट डान्स देखील चाहत्यांना पहायला मिळणार आहे. या टिझरने सध्या सोशल मिडावर धुमाकूळ घातला आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यासह त्यांचा डान्स पाहण्याची प्रतिक्षा प्रेक्षकांना लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!" असे या गाण्याचे बोल आहेत. हे एक पार्टी साँग आहे.  An electrifying , Biggest Bachelorette Anthem of the Year …… अस कॅप्शन देत अमृता यांनी या गाण्याचं पोस्टर रिलीज केल होत. यानंतर आता त्यांनी #JoinTheBrideTribe ! असं म्हणत या गाण्याचा टिझर शेअर केला आहे. 


या टीझरवरुन हे गाणं पार्टी मूडवालं असल्याचे स्पष्ट होतेय. या गाण्यात अमृता यांनी दोन तीन प्रकारचे ड्रेस परिधान केले आहेत. गोल्डन आणि इंडो वेस्टर्न  ड्रेससह अमृता यांचा एकदम ग्लॅमरस लुक या गाण्यात पहायला मिळणार आहे.  विशेष म्हणजे अमृता यांनी हे गाण गायल असून या गाण्याच्या व्हिडिओ एल्बममध्ये त्यांनी हटके डान्स देखील केला आहे. 24 सेकंदाच्या या व्हिडिओत अमृता फडणवीस यांच्या डान्सची झलक पहायला मिळाली आहे. आता चाहत्यांना अमृता फडणवीस यांचा पूर्ण डान्स पाहण्याची उत्सुकता लागली आहे. उद्या म्हणजेच  6 जानेवारीला 'टी सीरिज'चं हे गाणं प्रदर्शित होणार आहे. 


अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आणि आवड दोन्ही आहे. त्या लव्ह आणि पार्टी साँगसह वेगवेगळ्या विषयांवर गाणी बनवत असतात.  सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर  केली आहेत. तसेच त्यांचे भक्तीगीतांचे अनेक व्हिडिओ एल्बम देखील प्रदर्शित झाले. मात्र, "अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!" या गाण्यात अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या कलेसह त्यांचा नृताविष्कार देखील पहायला मिळाणार आहे.   


 



अमृता फडणवीसांनी संगीत क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  त्यांच्या गाण्यांची कधी प्रशंसा होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. मात्र, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्यांनी आपली गाण्याची आवड जपली आहे.  फॅशनच्या बाबतातही त्या आपल्या विशेष  व्यक्तिमत्व टिकवून आहेत. अमृता फडणवीस या सोशल मिडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. त्या आपल्या अनेक इव्हेंट्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.