Debina Bonnerjee​ : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कपूर (Alia Bhatt Kapoor), अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी या तिघींच्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. या तिघींचीही सोन परी दिसतात कशा अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. देबिना दुसऱ्यांदा मुलीची आई झाली आहे. 11 नोव्हेंबरला 2022 रोजी तिला मुलगी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी ( Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary ) नुकतेच दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. दोघांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. या कपलच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्रीने मुलीचा फोटो शेअर केला नसला तरी तिच्या तब्येतीची माहिती तिने नक्कीच दिली आहे. आपल्या नवीन पोस्टमध्ये, तिने मुलीला जन्म देणं किती कठीण होतं हे देखील सांगितलंय. 


आपल्या व्लॉगमध्ये देबीनाने तिचं दुख: व्यक्त केलं आहे. ईमोशनल होत अभिनेत्रीने सांगितलंय की, तिला प्रत्येक मिनिटाला रडावंसं वाटत होतं. ती असंही म्हणाली की, हे सगळं प्रसूतीनंतरचं नैराश्य असू शकतं. देबिनाने व्लॉगमध्ये पुढे सांगितलं की, जशा गोष्टी दिसतात तशा त्या प्रत्यक्षात अजिबात नसतात. सगळं काही इतकं सोपं नसतं. त्यांना रोज नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं. 


अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'मी दाखवते तितकं सोपं नाही. आजकाल प्रत्येक मिनिटाला असं वाटतं की मी रडतेय. कदाचित हे पोस्टपार्टम डिप्रेशन देखील असू शकतं, मात्र मला याबद्दल खात्री नाही.


मुलीच्या तब्येतीवर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
या व्लॉगमध्ये देबिनाने सांगितलं की, तिच्या लहान मुलीची तब्येत थोडी खराब आहे. देबिना म्हणाली- 'माझी धाकटी मुलगी निनुदीचा जन्म थोडा अगोदर झाला आहे. त्यामुळे ती खूप अशक्त आहे. एक दिवशी तिला अचानक गुदमरायला सुरुवात झाली. तिला श्वास घेता येत नव्हता. मी आणि गुरमीत लगेच तिला घेवून हॉस्पिटलमध्ये गेलो. सर्दीमुळे तिचे नाक बंद झालं होतं. तिची ऑक्सिजन पातळी 92 पर्यंत घसरली होती. आम्ही घर ते हॉस्पिटल असा प्रवास कसा केला मात्र त्यावेळी मी वेडी झाले होते.  मी गुरमीतला एकच विचारत होते की, तिचा श्वास सुरु आहे की नाही?'


लग्नाच्या 11 वर्षानंतर झाली आई
देबिना आणि गुरमीत चौधरी 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, देबिनाला तिच्या गरोदरपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. लग्नाच्या सुमारे 11 वर्षानंतर देबिनाने यावर्षी 3 एप्रिल रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला. 7 महिन्यांनंतर देबिना आणि गुरमीत यांना दुसरी मुलगी झाली. या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. अभिनेत्याने सांगितलं की आमची मुलगी वेळेपूर्वीच या जगात आली आहे. तुमची प्रार्थना तुमचे आशीर्वाद कायम सोबत असू द्या.