दीपिका ते माधुरी... ३०-३० किलोचं वजन पेलवत नाचणाऱ्या अभिनेत्रींची कमाल!
बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला: रामलीला, देवदास आणि आता पद्मावती... एक से बढकर एक सिनेमांचा भव्यदिव्य अनुवभ देणाऱ्या संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमांचं नेहमीच कौतुक केलं जातं...
मुंबई : बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला: रामलीला, देवदास आणि आता पद्मावती... एक से बढकर एक सिनेमांचा भव्यदिव्य अनुवभ देणाऱ्या संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमांचं नेहमीच कौतुक केलं जातं...
संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातील सेटस, अभिनेता - अभिनेत्रींचे पेहराव पाहायला जितके आकर्षक वाटतात... तेवढेच ते उभारताना कष्टदायकही असतात.
खासकरून, सोन्या-चांदीच्या आभुषणांत आणि जाडजूड पेहरावांचं वजन पेलवत गाण्यांवर डान्स करणाऱ्या अभिनेत्रींचं तर कमालच असते... ३०-३० किलोचं वजन अंगावर पेलवत भन्साळी यांच्या सिनेमातील अभिनेत्री नाचतानाही ग्रेसफूल दिसतात... आणि यातही संजय लीला भन्साळी यांची आवडती अभिनेत्री दीपिका पादूकोणनं हे शिवधनुष्य अनेकदा पेललेलं दिसेल.
१. याचंच ताज उदाहरण म्हणजे 'पद्मावती' सिनेमात दिसणारी दीपिका पादूकोण... या सिनेमातील घूमर रे या गाण्यात १०-२० नाही तर तब्बल ३० किलोंचा लेहंगा दीपिकानं परिधान केलाय. दीपिकाचा हा लूक प्रेक्षकांना भलताच भावलाय. दिल्लीच्या रिम्पल आणि हरुप्रीत नरुला यांनी दीपिकाच्या या लूकसाठी भरपूर मेहनत घेतलीय.
२. 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही दीपिकाचा लूक भलताच आकर्षक होता. या सिनेमातील एका सिनसाठी दीपिकानं एक लोखंडी कवच परिधान केलं होतं. हे कवच तब्बल २० किलोंचं होतं.
३. 'गोलियों की रासलीला: रामलीला' या सिनेमातही दीपिकानं वजनदार लेहंगा परिधान केला होता. 'नगाडे संग ढोल बाजे' या गाण्यात दीपिकानं परिधान केलेला लेहंगा तब्बल ३० किलोंचा होता. इतकच नाही तर या लेहंग्याचा घेत ५० मीटर कपड्यात बनलेला होता.
४. 'जोधा अकबर' या सिनेमात ऐश्वर्या भलतीच सुंदर दिसत होती. उल्लेखनीय म्हणजे, या सिनेमात तब्बल ४०० किलो सोनं गाळून ऐश्वर्यासाठी दागिने तयार करण्यात आले होते. सोबतच तिचे वस्रही भलतेच वजनदार होते.
५. 'देवदास' या सिनेमात ऐश्वर्या राय-बच्चन आणि माधुरी दीक्षित यांची जुगलबंदीही पाहायला मिळाली होती. या सिनेमातील एका गाण्यात 'काहे छेड छेड मोहे' या गाण्यासाठी माधुरीनं तब्बल ३० किलोचा लेहंगा आणि भरपूर असे दागिने अंगावर पेलले होते.