मुंबई :  लग्नबंधनात अडकल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या आगामी चित्रपटात दीपिका अॅसिड पीडित मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारलेली आहे. चित्रपटात दीपिका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अॅसिड पीडितेची कथा ऐकून ती अत्यंत भावनिक झाली, आणि तिचा स्वत:च्या अश्रूंवरचा ताबा सुटला. सुत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा दीपिका आणि दिग्दर्शक चित्रपटाच्या कथेसंबंधी बोलत असताना, दीपिकाच्या डोळ्यांमधून अश्रू अनावर झाले. त्यानंतर, तात्काळ दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी चित्रपटाचे चित्रिकरण थांबवले.


चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच दीपिकाचे बॉलिवूडकरांकडून चांगलेच कौतुक करण्यात आले. चित्रपटात दीपिका मालती नावाची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील तिच्या लूकच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.