दीपिकाचा रणवीरला इशारा म्हणाली, प्रेमात धोका..
दीपिका पदुकोण आज तिचं वैवाहिक जीवन खूप आनंदित जगत आहे.
मुंबई : दीपिका पदुकोण आज तिचं वैवाहिक जीवन खूप आनंदित जगत आहे. तिचा नवरा रणवीर सिंग तिच्यावर खूप प्रेम करतो. पण दीपिका पदुकोणला हे खरं प्रेम असंच मिळालं नाही तर तिला प्रेमात खूप वेळा धोकाही मिळाला आहे. या फसवणुकीमुळे ती डिप्रेशनचीही शिकार झाली होती. पण, आता जर रणवीर सिंगने तिची फसवणूक केली तर?
पतीसोबत खूप खुश आहे दीपिका
ते दोघंही जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा दीपिकाची फसवणूक झाली होती. त्यानंतर या दोघांच लग्न झालं. आणि आता हे कपल खूप आनंदी आयुष्य जगत आहे. पुर्वी फसवणूक झालेल्या दीपिकाला एक असा प्रश्न विचारण्यात आला जो ऐकून दीपिकाला आश्चर्याचा धक्का बसला. जर तुम्हाला कळलं की तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत आहे. तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? हा तो प्रश्न होता. त्यावर दीपिकाने दिलेलं उत्तर ऐकून ती एकेकाळी डिप्रेस असणारी तिच दीपिका आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल.
पतीने धोखा दिला तर...
एका मुलाखतीतल्या 'त्या' प्रश्नाला उत्तर देताना दीपिका म्हणाली, माझ्यासाठी हे डील ब्रेकर असेल. अस सरळ उत्तर देणं आणि हे स्वीकारणं फार कठीण जाईल असं मला वाटतं. 'ते नातं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे', 'दोन्ही लोकं त्या नात्यावर किती सक्सेस राहू?,' 'ती चूक होती' किंवा ती सवय झाली आहे का? 'मला वाटतं' या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लक्ष वेधून घेणार्या बर्याच गोष्टी आहेत. लोकं अनेकदा चुका करतात. त्यामागे हजारो कारणं असू शकतात.