नवी दिल्ली : टी.व्ही मालिकेतील सुपरहिट जोडी दीपिका कक्कड आणि शोएब अब्राहीम यांचे लग्न झाले. गेल्या काही दिवसांपासून शोएब-दीपिकाच्या लग्नाचा चर्चा सुरू होत्या. त्यांचे चाहतेही आपल्या आवडत्या जोडीच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होते. शोएब-दीपिकाची जोडी शोएका या नावाने प्रसिद्ध आहे. यांचे लग्न गृहनगर भोपाळ येथे झाले. निकाहासाठी दीपिकाने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. तर शोएबच्या डोक्यावर सेहरा सजला होता. लग्नानंतर २६ फेब्रुवारीला मुंबईत रिसेप्‍शनचे आयोजन करण्यात आले आहे.


दीपिकाचा दुसरा विवाह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत एअरहॉस्टेसचे स्वप्न घेऊन आलेल्या दीपिकाचा हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी तिने पायलट रोनक सॅमसंग सोबत विवाह केला होता. मात्र २०१२ मध्ये दोघे वेगळे होत असल्याची खबर आली. तर दीपिका आणि शोएबची ओळख २०११ मध्ये ससुराल सिमर का या मालिकेच्या सेटवर झाली. त्यानंतर मैत्री ते प्रेमाचा प्रवास करत ही जोडी विवाहबद्ध झाली.


पहा लग्नाचे सुंदर फोटोज...


 








दीपिका लवकरच बॉलिवूडमध्ये


दीपिका-शोएबच्या विविध विधींचे म्हणजे मेंहदी, संगीत, हळदीचे व्हिडिओज समोर येत आहे. त्यात त्यांची मस्ती, नाच पाहायला मिळत आहे. यापूर्वी त्यांचे प्री-वेडिंग फोटोज व्हायलर झाले होते. दीपिका कक्कड लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. जे.पी. दत्ता यांच्या पलटन सिनेमात ती झळकणार आहे. याची घोषणा दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.