Deepika Padukone is Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं अखेर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. दीपिकानं आता कोणती बातमी दिली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती लवकरच आई होणार आहे याचा खुलासा तिनं केला आहे. तिनं आणि रणवीरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याशिवाय तिनं कोणत्या महिन्याता बाळाचा जन्म होणार हे देखील सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात दीपिकाच्या प्रेग्नंसेची बातमी समोर आली होती, मात्र त्यावर दीपिकानं किंवा रणवीर आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत अधिकृत माहिती दिली आहे. त्याशिवाय तिनं कोणत्या महिन्यात बाळाला जन्म देणार याचा खुलासा देखील केला आहे. दीपिका सप्टेंबर 2024 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. तिनं ही पोस्ट शेअर करताच काही मिनिटांमध्येच लाखो लोकांनी या पोस्टला लाइक केले असून त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. 



काही आठवड्यांपूर्वी एक रिपोर्ट समोर आली होती ज्यात दावा करण्यात आला होता की दीपिका पदूकोण प्रेग्नंट आहे. दीपिका आणि रणवीर लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर दीपिका BAFTA अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती. तर त्याचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात तिचं बेबी बंप स्पॉट करण्यात आल्याचं अनेकांनी म्हटलं. मग काय चर्चा या जोरात रंगल्या. पण ती खरंच प्रेग्नंट आहे की नाही याची माहिती तिनं किंवा रणवीरनं तेव्हा दिली नाही तर आता दिली आहे आणि ती देखील एका वेगळ्या अंदाजात. 


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं 2018 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या पाच वर्षानंतर ते आई-वडील होणार आहेत. दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला दीपिकानं 'वोग सिंगापुर' ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की तिला आई व्हायचं आहे. रणवीर आणि तिला मुलं फार आवडतात. त्याशिवाय तिनं सांगितलं की 'मला त्या दिवसाची प्रतिक्षा आहे जेव्हा आम्ही एक कुटुंब सुरु करू.'