Deepika Padukone and Ranveer Singh Baby Girl Name : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone and Ranveer Singh) आई-बाबा झालेत...गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे  8 सप्टेंबर रोजी  दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जवळपास सव्वा महिन्यानंतर मुलीचे नाव ठेवले आहे. सोशल मिडियावर पोस्ट शेअर बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. तसेच मुलीचे नाव काय ठेवले हे देखील आल्या चाहत्यांना सांगितले आहे.  


हे देखील वाचा... जन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसुतीच्या दोन दिवस आधी रणवीर आणि दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दीपिकाला तिच्या आईबरोबर नेण्यात आलं होतं.  8 सप्टेंबर रोजी दीपिकाने चाहत्यांना अनंदाची बातमी दिली. इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात दीपिका आणि रणवीरच्या फोटोवर Its a girl असं लिहिण्यात आलं आहे. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपीका रणवीर यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यानंतर दीपीकाने आता बाळाचे नाव जाहीर केले आहे. 


दीपीकाने आपल्या मुलीचे नाव 'दुआ' असे ठेवले आहे. दीपीकाने सोशल मिडियावर मुलीचा फोटो शेअर केला आहे. मुलीचे नाव 'दुआ' असे ठेवण्यात आल्याचे दीपिकाने पोस्टमध्ये सांगितले आहे. दुआ पादुकोण सिंह... दीपीकाने नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. दुआ म्हणजे प्रार्थना... दुआव आमच्या प्रार्थनचे उत्तर आहे. तिच्या येण्यामुळे आमचं आयुष्य प्रेम आणि आनंदाने भरले आहे... दीपिका आणि रणवीर... अशी पोस्ट दीपिकाने केली आहे. 


 



2018 मध्ये दीपिका-रणवीर यांनी  इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. जवळचे मित्र-मैत्रिण व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा हा शाही लग्न सोहळा पार पडला होता. त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरुत त्यांनी रिसेप्शन पार्टी ठेवली होती.  फेब्रुवारी महिन्यात दीपिका आणि रणवीर यांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आई वडिल होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. गेल्या आठवड्यातच दीपिकाने मॅटरनिटी फोटोशूट केले होते. मॅटरनिटीच्या बोल्ड फोटोशूटमुळे दीपीकाला ट्रोल देखील करण्यात आले.