मुंबई : पद्ममावतला मिळालेल्या यशामुळे दीपिका पादूकोण सध्या प्रचंड आनंदी आहे. एवढ्या विरोधानंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय. त्यामुळे दीपिका भारावून गेलीय. त्यामुळेचं मीडियाचे आभार मानण्यासाठी दीपिकाने एका पार्टीचं आयोजन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षभरापासून वादात सापडलेला 'पद्मावत' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेचं दीपिकाने सिनेमाचं यश साजरं करण्यासाठी एका खास पार्टीचं आजोजन केलं होतं.


'पद्मावत'ला मिळणारा फॅन्सचा सपोर्ट बघून दीपिका भारावून गेलीय. त्यामुळेचं तिला पाठिंबा देणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी दीपिकाने या पार्टीचं आयोजन केलं होतं..


एका रेस्टॉरंटमध्ये दीपिकाने मीडिया प्रतिनिधींबरोबर शाही थाळीचा आस्वाद घेतला. 'पद्मावत'मध्ये काम केल्याचा आपल्याला गर्व असल्याचं दीपिका यावेळी म्हणाली. 'पद्मावत'ला हिट करण्यासाठी वर्षभरासाठी मेहनत घेतली असल्याचं दीपिकाने यावेळी आवर्जून सांगितलं. 


दीपिका 'राणी पद्मावती'च्या भूमिकेत इतकी शिरली होती की तिच्यापेक्षा उत्तम हा रोल कोणीचं करु शकत नाही, असं आता तिला वाटू लागलंय.


पद्मावतसाठी दीपिकाने दिग्दर्शक विशाल भारव्दाजच्या आगामी सिनेमाचं शूटही पुढे ढकललं होतं. आता 'पद्मावत' प्रदर्शित झालाय आणि सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळतोय. दीपिका आता विशाल भारव्दाजच्या आगामी सिनेमाचं लवकरचं शूट सुरु करणार आहे.


बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिकाची जबाबदारी आता वाढली असून आगामी काळातही ती चांगले सिनेमे करेल, अशी आशा करायला हरकत नाही.