Deepika Padukone Viral Video: दीपिका पादूकोण आपल्या फॅशन सेन्ससाठी आणि स्टायलिंगसाठी I(Deepaika Padukone) ओळखली जाते. आपल्या हटके स्टाईलनं दीपिका कायमच सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडते. आपल्या अभिनयासोबतच आपल्या फॅशनचेही वेगळे चाहते दीपिकानं निर्माण केले आहेत. मध्यतंरी कान्स महोत्सवासाठी (Deepika Padukone Cannes) दीपिकाची फॅशन बरीच चर्चेत आली होती. आता दीपिकानं पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली असून सध्या दीपिकाच्या पॅरिस फॅशन वीकच्या (Paris Fashion Week) फोटोंचीच सगळीकडे एकच चर्चा आहे. (Deepika Padukone attends Paris Fashion Week show with parents fans says Mama Padukone is more beautiful)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोण नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये तिच्या पालकांसोबत स्पॉट झाली होती. यावेळी दीपिकाची आईही (Deepika Padukon Mother) उपस्थित होती. दीपिकाच्या आई-वडिलांना अभिमान वाटावा यासाठी चाहत्यांनीही तिचं जोरदार कौतुक केले. दीपिकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी दीपिकापेक्षा तिची आईचं जास्त सुंदर दिसत होती म्हणून सोशल मीडियावरू जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Deepika Padukone Video) 


हेही वाचा - तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, तुम्हाला तुमच्या पालकांसह आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाहून खूप आनंद झाला. याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. त्याच वेळी, आणखी एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, यशाच्या क्षणांमध्ये पालकांसोबत असणे किती भाग्यवान आहे. (Deepika Padukone Mother)


दुसरीकडे, फॅशन वीकमध्ये दीपिका पदुकोण खूपच सुंदर दिसत होती, तिची आई उज्जला पदुकोण देखील कोणापेक्षा कमी दिसत नव्हत्या. त्यांच्या सौंदर्याचे चाहत्यांनीही कौतुक केले. एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, केवळ दीपिकाच नाही तर तिची आई देखील खूप सुंदर दिसत आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, मामा पदुकोण खूप सुंदर आहेत.


 


हेही वाचा - 'मी कोणाला पैसे...', लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा


दीपिका पदुकोण शेवटची स्क्रीनवर शकुन बत्राच्या 'गहेरियां' (Geheraiyyain) या चित्रपटात दिसली होती. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'पठाण', 'फायटर' आणि प्रोजेक्ट 'के' सारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय ती हॉलिवूडच्या क्रॉस कल्चरल रोमँटिक कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे.