मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा स्टायलिश अवतार चाहत्यांना नेहमीच तिच्याकडे आकर्षित करतो. ती जे काही घालते, किंवा करते, तो एक ट्रेंड बनतो. आज जगभरातील महिला चाहत्यांनी दीपिकाची शैली कॉपी केली आहे. मात्र, यादरम्यान असं, काहीतरी घडलं ज्यामुळे दीपिका ट्रोल होऊ लागली आहे. वास्तविक, अभिनेत्री काही दिवसांपासून तिच्या जुन्या कपड्यांचा लिलाव करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका मदत करण्यासाठी विकत आहे कपडे 
दीपिका हे सगळं मदत कारण्यासाठी करत आहे. या कपड्यांमधून मिळवलेले पैसे ती 'लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन'ला दान करणार आहे. मात्र, आता दीपिकाने या काळात अशी चूक केली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावरील अनेक युजर्सने तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.


केला जात आहे असा दावा 
बऱ्याच लोकांनी असा दावा केला आहे की, दीपिकाने आपल्या कपड्यांपैकी एक ड्रेस असा लिलावात ठेवला होता की, जो तिने अभिनेत्री जिया खान आणि दुसरे प्रियंका चोप्राचे वडील अशोक चोप्रा यांच्या अंतिम संस्कारात घातलेला ड्रेस. आता शरण्य शेट्टी नावाच्या ट्विटर युजरनेने त्याच्या वेबसाईटवरून 2 स्क्रीनशॉट शेअर करून आश्चर्य व्यक्त केलं आहे.


चाहत्यांचं तुटलं हृदय 
चाहत्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'मला खूप आश्चर्य वाटलं. माझ्या आवडत्या दीपिका पदुकोणने तिच्या 2013च्या कपड्यांचा लिलाव केला आहे. मी पुन्हा सांगतो, 2013 चे कपडे तिने दोन वेगवेगळ्या अंत्यविधी दरम्यान घातले. आता एस ट्वीटचा स्क्रीनशॉट जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजरने यावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.



दीपिकाला ट्रोल करताना एका युजरने लिहिलं की, 'हे कपडे चॅरिटीसाठी विकण्याऐवजी तिने ते काही गरजूंना दान करायला हवे होते.' तर दुसर्‍या युजरने लिहिलं आहे की, '14-15 वर्षांचे शूज आणि कपड्यांचा लिलाव करण्यात काय अर्थ आहे, तुम्ही ते एखाद्या गरजूला देऊ शकता.' या व्यतिरिक्त, वापरकर्ते दीपिकाला सतत फटकारत आहेत.